कराची (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूनवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्यामुळे आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतावर आरोप करत आहेत की, भारत पाकिस्तानवर सशस्त्र हला करण्याची योजना आखत आहे. मागील पाच दिवसांमध्ये इम्रान खान यांनी दुसऱ्यांदा असे वक्तव्य केले आहे. बुधवारी सार्वजनिक ठिकाणी बोलताना त्यांनी भारत हल्ल्याची योजना आखत असल्याचे सांगितले. यापूर्वी देखील त्यांनी भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी करत आहे, भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करू शकतो असे इम्रान खान यांनी म्हटले होते. त्यानंतर पुन्हा बुधवारी त्यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानच्या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इम्रान खान यांनी दुसऱ्यांदा ट्विट करून भारताकडून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई होऊ शकते असे सांगितले आहे.
या व्यतिरिक्त ते असेही म्हणाले आहेत की, भारतानं नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचे उल्लंघन केले ज्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर पाकिस्तानाकडून घुसखोरी करून भारतीय सैन्यांच्या तळावर हल्ले करण्यात येत आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया सुरु असून त्या अद्याप थांबलेल्या नाहीत. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सतत प्रोत्साहन देण्याचे काम पाकिस्तानकडून सुरु आहे.
Imran Khan
✔
@ImranKhanPTI
15 homes torched by Indian Occupation forces in Srinagar yesterday as 900k security forces subject Kashmiris to brutal oppression. Modi’s Hindutva Supremacist Occupation Govt is committing war crimes in IOJK including changing the demography in violation of 4th Geneva Convention
View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter
30.3K
12:06 AM – May 21, 2020
Twitter Ads info and privacy
15.4K people are talking about this
इम्रान खान यांना आपल्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता आला नाही, त्यामध्ये त्यांना अपयश येत आहे. तसेच ते जे काही सांगत आहेत त्याला सैन्यांकडून विरोध होत आहे. अशा परिस्थिती आता इम्रान खान यांनी नवा मार्ग शोधून काढला आहे. ते सतत म्हणत आहेत की, भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून शकतो. जेणे करून सैन्याचे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेता येईल.
असे केल्याने पाकिस्तानचे सैन्य देखील घाबरेल आणि आपली तयारी सुरु करतील आणि सैन्याचे लक्ष काहीवेळासाठी आपल्यावरून हटेल असे इम्रान खान यांना वाटते. बुधवारी सायंकाळी उशिरा ट्विट करून इम्रान खान यांनी म्हटले आहे की, भारत पुन्हा पाकिस्तानवर सशस्त्र हल्ल्याची तयारी करत आहे, इम्रान खान हे सतत बोलून दाखवत असून मागील पाच दिवसात त्यांनी दुसऱ्यांदा असे बोलून दाखवले आहे.
एका दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की, श्रीनगरमध्ये भारतीय सैन्यांनी श्रीनगरमधील 15 घरांवर हल्ला केला कारण 900k स सुरक्षा सैनिकांनी काश्मिरी लोकांवर अत्याचार केले. पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, काश्मीरमध्ये भाजप सरकार गुन्हे करीत आहे. यासाठी त्यांनी चौथ्या जिनेव्हा अधिवेशनाच्या उल्लंघनाचा हवाला दिला.







