पुणे (वृत्तसंस्था) – नारायणगाव, लग्नाच्या वरातीमध्ये विनापरवाना डीजे वाजवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयूर शहाजी शेळके (रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फिर्याद पोलीस नाईक रामचंद्र वामनराव शिंदे यांनी दिली.
खोडद जवळील गडाचीवाडी येथे दि. 19 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ऋषीकेश भोर याच्या लग्नाच्या निमित्ताने वरात सुरू होती. यावेळी मयूर शहाजी शेळके यांच्या मालकीच्या आयशर टेम्पोवर (एमएच 16 एई 6739) बेकायदेशीर विनापरवाना डीजे चालू होता. डीजेसमोर 8 ते 10 लोक तोंडाला माक्स न लावता नाचत असताना दिसले. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.







