जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तहसिल कार्यालय,चाळीसगाव येथे 15 मार्च 2020 रोजी सकाळी
11.00 वाजता जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहकांचक प्रबोधन व्हावे या उद्देशाने तसेच ग्राहक संरक्षण कायदा 1986 यावर प्रबोधनपर कार्यक्रम व ग्राहक जागृती विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रबोधपर कार्यक्रम आणि प्रदर्शनात वजन मापे,अन्न औषध प्रशासन,विज वितरण कंपनी,गॅस,आदि विभाग सहभागी होणार आहे.
जागतिक ग्राहक जागृती विषयक प्रबोधनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली खासदार उन्मेश पाटील,आमदार मंगेश चव्हाण,उपविभागीय अधिकारी चाळीसगाव लक्ष्मीकांत साताळकर हे असणार असून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत,जळगावचे उपध्यक्ष बाबासाहेब वसंतराव चंद्रात्र्ये,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदिप रामराव देशमुख, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण,पंचायत समिती सभापती अजय पाटील,अशासकीय सदस्य तथा तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत रमेश सोनवणे,कृषि उ.बाजारा समिती सरदारसिंग राजपुत,तालुका अध्यक्ष आनंदराव साळुंखे,अशासकीय सदस्य ग्रंथमित्र अण्णा धुमाळ,महिला अध्यक्षा सुशिला महाजन,तालुका संघटक राजेश ठोंबरे,तालुका सचिव रावसाहेब पाटील,
तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ब्रिगेडियर विजय अनंत नातू, सुकदेव पाटील,विकास वाणी (बागड) खुशाल पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी चाळीसगाव शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून ग्राहकांसाठी प्रबोधपर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसिलदार चाळीसगाव अमोल मोरे यांनी एकाप्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.