नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्ली हिंसाचार प्रकरणी अमोल कोल्हे काल संसदेत भाजप सरकारवर तुटून पडले. अमोल कोल्हे यांनी यावेळी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला.या हिंसाचारात मुस्लीम, हिंदू मरण पावले नाहीत, तर या हिंसाचारात कोणी मरण पावलं असेल तर तो माणूस मरण पावला. जे रक्त सांडलं ते हिंदूचं किंवा मुस्लीमांचं नाहीतर ते माणसाचं वाहिलं. ज्या नाल्यांमध्ये मृतदेह सापडले तो कोणाचा तरी भाऊ होता, कोणाचा मुलगा होता, कोणाचा नवरासुद्धा होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे, असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.या हिंसाचारामुळं आपल्या देशाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. यावरच अमोल कोल्हेंनी सरकारला प्रश्न विचारले ते म्हणाले दिल्ली पोलिस हा हिंसाचार रोखण्यासाठी समर्थ नव्हते का? आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर वेळीच कारवाई का करण्यात आली नाही? ही सगळी जबाबदारी कोणावर होती आणि ही सगळी जबाबदारी घेण्यासाठी ते तयार आहेत की नाही? असा सवाल कोल्हेंनी यावेळी विचारला.आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना आपण विचारणार आहात का, की जी मुलं अनाथ झाली, ज्या आमच्या बहिणी विधवा झाल्या, त्या जीवांची भरपाई कोणं देणार? असंही ते म्हणाले