चाळीसगाव प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुक वर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा चाळीसगाव येथे शिवप्रेमी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला असून संबंधित इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड व तहसीलदार यांच्याकडे आज दि 3 रोजी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुक अकाऊंट वरून जितेंद्र राऊत नामक इसमाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केली याबाबत त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली या घटनेचा चाळीसगाव येथील शिवप्रेमी संघटनांनी निषेध केला असून त्या फेसबुक अकाऊंटची तपासणी करून सदर इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.