नवी दिल्ली (वृत्तसंथा) – इटलीहून पर्यटनासाठी आलेल्या १५ व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंबंधीचे वृत्त डीडी न्यूजने दिले आहे. या १५ जणांना आयटीबीपी कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी केली असता २१ पैकी १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांना वेगळं ठेवण्यात आलं होतं. दिल्लीत आल्यानंतर एम्समध्ये नमुन्यांची तपासणी केली असता सर्व जणांना करोना व्हायरसची लागण असल्याचं निष्पन्न झालं. या सर्वांना आयटीबीपी कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसने पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता राज्यालाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. नवी दिल्ली, तेलंगणा, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही करोना व्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. हा संशयित रुग्ण मंगळवारी नाशिकमध्ये आढळून आला आहे.