नवी मुंबई (वृत्तसंस्था) – शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० च्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक मार्केटमुळे (वाशी एपीएमसी मार्केट) मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला असल्यांचे आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने दोन वेळा एपीएमसी मार्केट बंद करण्यात आले होते.

एपीएमसी मार्केट पुन्हा १८ मे रोजी सुरु करण्यात आले आहे. प्रशासनाने एक आठवडा मार्केट बंद करुन आता सुरु केले आहे. मुंबई आणि उपनगरात भाजीपाला, फळ , अन्नधान्य थेट घेवून जाणे गरजेचे आहे. मात्र बाजार समितीने नियम पाळले नाही आणि पुन्हा कोरोनाचा आकडा वाढला तर मात्र मार्केट बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरुन, अशा इशारा भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.







