नवी दिल्ली (वृत्तासंस्था) – जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय हद्दीत घुसणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला भारतीय जवानांनी पाडले आहे. बीएसएफच्या एका पथकाने कठुआमधील हिरानगर सेक्टरच्या रथुआ परिसरात हे ड्रोन उडताना पाहिले होते. यामध्ये काही हत्यारेही सापडली आहेत. माहितीनुसार, ड्रोनसोबत एक रायफल, दोन मॅगजीन, ६० राउंड आणि ७ ग्रेनेड बांधलेले होते. काश्मीर खोऱ्यात हिंसाचार चिथावणी देण्याचाही प्रयत्न होत आहे.

दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्स आणि सैन्याकडून अशा घुसखोरी व टेहाळणी करणाऱ्या ड्रोनचा वापर, भारतीय जवानांच्या हालचालीवंर लक्ष ठेवण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी केला जात असून, याचाच वापर दहशतवाद्यांना माहिती पुरवण्यासाठी देखील केला जात आहे.







