मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 300 च्या पार पोहचली असल्याची माहिती मिळत आहेत. नवीन माहितीनुसार राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 302 झाला आहे. आज राज्यात 72 नवीन रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती आहे. या 72 जणांमध्ये एकट्या मुंबईत 59 रुग्ण आढळून आले आहेत. तर नागपूरमध्ये 3, नवी मुंबई, पुणे, कल्याण, ठाण्यात प्रत्येकी 2 – 2 रुग्ण आढळून आले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात दर तासाला वाढ होतांना दिसून येत आहे.