नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने रमजानसंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये रमजान दरम्यान महत्वाच्या गोष्टींची काळजी घेण्यास नागरिकांना सांगितले आहे. तसेच काही मुस्लिम धार्मिक संघटना देखील मुस्लिम समाजाला आरोग्य विभागाच्या निर्देशाचे पालन करावे, धार्मिक पार्थनेच्या वेळी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे कि, रमजान महिन्यात नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी दिली तर, कोरोनाचा वाढत असणारा धोका कमी करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करायला हवी. तसेच नागरिकांनी रमजान महिन्यात एकमेकांना अभिवादन करण्यासाठी छातीवर हात ठेऊन किंवा नमस्कार करण्याला प्रोत्साहन द्यावे. ज्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, अशा नागरिकांनी सामाजिक संपर्क टाळावा, कोरोनाबाधित व्यक्तींनी घरातच राहून रमजान साजरा करावा, अशा कोरोनाबाधित नागरिकांना कोणालाही भेटू देऊ नये असे निर्देश दिले आहेत.गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनी तसेच वृद्ध व्यक्तींनी घरातच राहण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी रमजान महिन्यात सामाजिक सपंर्क टाळावा, सरकाने दिलेले निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे, जर काही नागरिक रमजानमध्ये नमाजसाठी एकत्र आले असतील तर, नागरिकांनी सोशल डिस्टंशिंगची काळजी घेतली पाहिजे. असे जागतिक आरोग्य संघटनेनें दिशा- निर्देशात म्हटले आहे. नागरिक नमाज पठण करण्यासाठी मज्जीदमध्ये एकत्र जमले असतील तर त्यांनी एक -एक करूनच मज्जीदमध्ये प्रवेश करावा. सरकारच्या वतीने रमजानमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना सुनिश्चित केल्या पाहिजेत. रमजानच्या सामाजिक आणि धार्मिक उत्सवांविषयी माहिती स्पष्ट असायला हवी. असे दिशानिर्देश जागतिक आरोग्य संघटनेने रमजान महिन्यासाठी जाहीर केले आहेत.