जळगाव – येथील जाखनी नगर कंजर वाडा येथील एका 65 वर्षीय वृद्धाचा पॉझिटीव्ह अहवाल रविवारी सायंकाळी 6 वाजता प्राप्त झाला हा व्यक्ती गेल्या 3 दिवसापासून जिल्हारुग्णालयात कोरोना संशयित म्हणून उपचारसाठी दाखल होता त्याचे शुक्रवारी स्यब घेतले असता वृद्धाचा रिपोर्ट रविवारी पिझिटिव्ह आल्याने कंजर वाड्यात एकच खळबळ उडाली आहे.हा वृद्ध व त्याची पत्नी काही कामानिमित्त पुण्याला गेला होता असे समजते. तिकडून आल्यानंतर त्याला त्रास जाणवत असल्याने त्याने व त्याची पत्नी यांनी जिल्हा रुग्णालयात प्राथमिक तपासणी केले असता त्यात वृद्धाला उपचारासाठी दाखल करून कोरोना बाबत तपासणी केली होती त्यानंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने रविवारी सायंकाळी कंजर वाड्यात निर्जंतुकिकरनाची फवारणी करण्यात आली.परिसरात एकच खळबळ उडाली आहे.