• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑनलाइन उपक्रम राबवून प्राध्यापक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजात गुंतवून ठेवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – वरिष्ठ महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. प्राध्यापक, कर्मचारी यांना करोनाची धास्ती बाळगत महाविद्यालयात जावे लागते. शिवाय, त्यांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. यामुळे प्राध्यापकांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे.

लॉकडाऊन काळात वरिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने प्राध्यापकांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यात येत होते. या कालावधीत विविध महाविद्यालयांनी ऑनलाइन उपक्रम राबवून प्राध्यापक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजात गुंतवून ठेवले. ऑनलाइन प्रश्‍नमंजुषा स्पर्धा, विविध विषयांवर वेबिनार, कार्यशाळा, सेमीनार घेतले. काही महाविद्यालयांनी या उपक्रमांसाठी शुल्क घेऊन पैसे कमविण्याची संधीही साधली.

शासनाच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांचे कामकाज सुरू झाले आहे. संलग्नता, शासन, विद्यापीठ, यूजीसी यांच्याकडे विविध प्रस्ताव, अहवाल पाठविणे, महाविद्यालयीन सुविधा व संसाधने अद्ययावत करणे, निकालांचे कामकाज पूर्ण करणे, विद्यापीठांकडे निकाल विषयक माहिती सादर करणे, नॅक मूल्यांकनाबाबतच्या पूर्वतयारीची कामे करणे, आयक्‍युएसीची प्रलंबित कामे पूर्ण करणे, ई-कन्टेंट विकसित करणे आदी कामकाजाला नवीन शैक्षणिक वर्षात मुहूर्त लागला. शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य यांनी विभागप्रमुख, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कर्मचारी यांच्या बैठका घ्यायला सुरुवातही केली. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, हात साबण व पाण्याने सतत स्वच्छ ठेवा, अशा सूचनाही देण्यात येऊ लागल्या. अध्यापनात ऑनलाइन, ऑफलाइन नियोजन करा. विद्यार्थ्यांचे व्हॉटस्‌ ऍप ग्रुप अपडेट करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणा, अशा सूचना अनेक महाविद्यालयांच्या बैठकांमध्ये दिल्या.

करोनाचे संकट कायम असल्याने प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांच्याच मनातील भीती अद्याप कायम आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील महाविद्यालयांनीही शासन, विद्यापीठ यांचे आदेश धुडकावत कामकाज सुरू ठेवले आहे. मात्र, याविरुद्ध दाद मागायची कोणाकडे असा प्रश्‍न प्राध्यापक, कर्मचारी यांना पडला आहे. सर्वच महाविद्यालयांना कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना न्याय मिळेना
बहुसंख्य महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्‍त आहेत. त्यातच आता नवीन पद भरतीला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांच्या नियुक्‍त्या करून त्यांना राबवून घेण्याचा धडाका यंदाही काही अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात कायम राहणार आहे. तासिका तत्त्वावर किंवा हंगामी काम करणाऱ्या बऱ्याचशा प्राध्यापकांचे पगार महाविद्यालयांनी थकवून ठेवले आहेत. यामुळे या प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्राध्यापकांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात होत आहे.


 

 

Previous Post

येलवाडीत कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी

Next Post

कोरोना संशयित म्हणून अपनास्पद वागणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना संशयित म्हणून अपनास्पद वागणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon