नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात आज नवी दिल्लीत रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत देशातील लोकडाऊन संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, स्मृती इराणी, संतोष गंगवार, रमेश पोखरीयल,राम विलास पासवान, आणि गिरीराज शिंह उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ में पर्यंत वाढवले आहे. मात्र, २० एप्रिल पासून देशातील काही शहरात लॉकडाऊन स्थितील करण्यात येणार आहे. देशातील जे शहर ग्रीन झोनमध्ये येतात त्या शहरात काही प्रमाणात व्यवहार सुरळीत करण्यात येणार आहेत. तसेच औद्योगिक प्रक्रिया सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ११ हजार ९०६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, १ हजार ९९१ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिल्लीत आतापर्यंत १ हजार ७६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला आहे.