जिल्हयात पहील्यांदाच उपक्रमाचे नागरिकांकडुन कौतुक
पारोळा ( प्रतिनिधि )
कोरोनाचा वाढता संसर्ग व तालुक्याच्या उंबरठ्यावर कोरोनाचा शिरकाव या पाश्वभुमीवर पालिका व प्रशासन महत्वाची भुमिका निभावत असुन नागरिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढावी व त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी आयुष मंत्रालय भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरातील प्रत्येक प्रभागात नगराध्यक्षासह नगरसेवक होमिओपँथी गोळ्या वाटप करित आहे.विशेष म्हणजे जिल्हयात पारोळा शहरातच प्रथम गोळ्यांच्या वाटपाची सुरुवात झाल्याने नागरिकांनी पालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचे मनापासुन आभार मानले.
कोरोना आजाराने
संपुर्ण जगात थैमान घातले आहे.तसेच दिवसेंदिवस राज्यासह जिल्हयात कोरोना बाधितांती संख्खा वाढतांना दिसत आहे.मात्र सुदैवाने तालुक्यात अद्याप पर्यत कोरोनाचा शिरकाव झाला नाही.असे असले तरी गाफील न राहता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन नागरिकांनी सावधानता बाळगली पाहीजे.कोरोनावर अद्यापपर्यत तरी औषध सापडले नसुन त्यावर मात करणेसाठी ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली त्याला हा आजार होत नसल्याचे निर्दशनास आल्याने आयुष मंत्रालय भारत सरकारच्या मार्फत (Ars-alb30 ) होमिओपँथी गोळ्यांची शिफारशी नुसार आज माजी पालकमंत्री व आरोग्यदुत गिरीष महाजन यांचे वाढदिवसाच्या औचित्य साधत नगराध्यक्ष व नगरसेवक हे स्वखर्चाने शहरात सर्वच प्रभागात नागरिकांना गोळ्या वाटप करण्यात येत आहे.हे औषध विनामुल्य असुन याचा वापर करावा,वारंवार हात धुवावेत,फिजीकल डिस्टन्स पाळावे,गरजेनुसार बाहेर निघावे अश्या सुचना नगराध्यक्ष व नगरसेवक नागरिकांना देत असल्याने नागरिकात समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी नगराध्यक्ष करण पाटील,दिपक अनुष्ठान,भैय्या चौधरी,कैलास चौधरी,मनिष पाटील,बापु महाजन,मंगेश तांबे,प्रकाश महाजन, पी जी पाटील,अंजली पाटील,वैशाली पाटील,रेखा चौधरी,सुनिता वाणी,जयश्री बडगुजर,अलका महाजन,मोनाली राजपुत,वर्षा पाटील छाया पाटील यांचेसह करण पाटील मित्र मंडळ हे प्रभागात जावुन होमिओपँथी गोळ्या देत कोरोनाबाबत जनजागृती करित आहे.