नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर आता नवीन गटनेता पदासाठी जेष्ठ नगरसेवक आबा बागुल, अभ्यासू नगरसेवक अविनाश बागवे आणि रविंद्र धंगेकर यांचे नाव आघाडीवर आहेत.
मागील काही महिन्यांपासून काँग्रेसचा गटनेता बदलण्याची मागणी करण्यात येत होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघात अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी शिंदे यांचा पराभव केला होता. याच मतदारसंघात नगरसेवक रविंद्र धंगेकर काँग्रेसतर्फे प्रबळ इच्छुक होते. त्यांनी सुरुवाती पासून विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती.मात्र, त्यांचा ऐनवेळी पत्ता कट करून अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागुल इच्छुक होते. त्यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही. काँग्रेसचे निरीक्षक अनिल शर्मा यांनी यांनी पुणे शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेस गटनेते पदाची संधी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.