यावल (प्रतिनिधी) – शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे एकूण ऐंशी लाख रुपयाचे कामास गेल्या दोन दिवसापूर्वी सुरुवात करण्यात आली, मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करताना सुरुवातीला रस्त्यावर बीबीएम चे काम न करता तसेच ड्रेसिंग तथा साफसफाई चांगल्या प्रकारे न करता सरळ कार्पेटचा थर मारून डांबरीकरणाचे निकृष्ट प्रतिचे काम होत असल्याने संपूर्ण यावल शहरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून या डांबरीकरणाच्या कामाकडे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी, नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता एस. ऐ. शेख. यांच्यासह यावल नगरपरिषद नगरसेवकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
यावल शहरात विविध पाच भागातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामकरिता एकूण 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, डांबरीकरणाचे काम गेल्या दोन दिवसापासून सुरू झाले असले तरी डांबरीकरणाचे काम मंजूर प्लॅन इस्टीमेंट प्रमाणे होत नसल्याने तसेच डांबरीकरणाच्या आधी रस्त्याचे ड्रेसिंग, साफ-सफाई, बीबीएम कार्पेट, सिलकोट काम अत्यंत घाईगर्दीत निकृष्ट प्रतीचे होत असल्याने यावल शहरात नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत, याबाबत यावल नगर परिषद बांधकाम शाखा अभियंता एस. ऐ. शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता डांबरीकरणाचे कामांमध्ये बीबीएम चे काम नसल्याची माहिती त्यांनी सांगितली रस्ता ज्याठिकाणी जास्त खराब झाला आहे त्याच ठिकाणी बीबीएम चे काम करण्यात येईल असे सुद्धा त्यांनी सांगितले.
यावल शहरात विविध पाच भागातील रस्त्यांचे ऐंशी लाख रुपयाचे डांबरीकरणाचे काम बीबीएम न करता सुरू असल्याने रस्ता डाग- डुगी काम होत आहे का ? रस्ते डांबरीकरणाचे कामात प्लॅन इस्टिमेट प्रमाणे बीबीएम चे काम जर नसेल तर एवढा मोठा निधी खर्च करणे बाबत तसेच यावल नगरपरिषदेच्या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून बांधकाम ठेकेदार, मुख्याधिकारी, बांधकाम शाखा अभियंता, आणि काही नगरसेवकांच्या टक्केवारी मुळे डांबरीकरणाचे काम बोगस निकृष्ट प्रतीचे होत असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे. यावल नगरपरिषदेच्या बोगस कामांकडे जिल्हाधिकारी जळगाव यांनी आपले लक्ष केंद्रित करून जिल्हास्तरावरून एक चौकशी समिती नेमून कामांची चौकशी करून संबंधितांवर पुढील कार्यवाही करावी असे सुद्धा बोलले जात आहे