नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown 4) 31 मे पर्यंत वाढवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 30 हजारांच्या वर गेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन टप्प्यात लागू केलेल्या लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा हा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे.
पीएम मोदी यांनी मागील वेळी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन-4 संदर्भात घोषणा केली होती. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. 18 मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. मात्र लॉकडाऊन 4 नव्या स्वरुपात असून याचे नियम वेगळे असतील असंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.








