धुळे – शहर पोलीस गोपनीय पथकाची धडक कारवाई पॉश कार मधुन अवैधरित्या वाहतूक करताना विदेशी दारुसाठासह दोघांना केले गजाआड.
याबाबत मिळालेली माहिती की देशात लॉक डाऊन सुरू असताना ग्रामिण भागातून एका पांढऱ्या रंगाच्या पॉश कार मधुन विदेशी मद्य साठा शहरात आणण्यात येणार आहे.माहिती मिळताच शहर पोलीसांनी लॉक डाऊन सुरू असताना साक्री रोड वर बंदोबस्त तैनात करून महामार्गाहुन शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांवर नजर ठेवण्यात आली याच दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पॉश कार i20 हुन्दाई क्रं. एम एच 18 / बी सी 3928 हि कार कुमार नगरात दाखल झाली.कुसूंबा गावाकडुन हि कार दाखल झाली.गाडीचा संशय आल्याने तिची तपासणी केली असता डिक्कीत खोक्यात विदेशी मद्य साठा आढळला.
पोलीसांनी गाडी चालकसह गाडी शहर पोलिस ठाण्यात आणली.डिक्कीतील बॉक्स खाली करण्यात आले.यात इंम्पिरीयर ब्लु कंपनीचे विदेशी दारू नग 46 व अन्य विदेशी दारू साठा असा 11,210 रुपयांचा माल,कारची किंमत 6,00000 लाख रुपये.एकुण किंमत 6,11,210 रुपयांचा माल चालक गोपाल सोमनाथ चौधरी, गाडी मालक लक्ष्मण नारुमल लुल्ला दोघांन विरुद्ध विना पास परमिट अवैधरित्या स्वत: जवळ साठा करुन कोव्हीड 19 लॉक डाऊन असताना गैरफायदा घेत वाहतूक करताना छापा टाकून हि कारवाई करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्यात पो कॉ.राहुल रविंद्र गिरी यांचे तक्रारी नुसार फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ,शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकांत पाटील,असई हिरालाल बैरागी,असई एस एन आखाडे,पो.ना मुक्तार मंन्सुरी,पो.ना.योगेश चव्हाण,पो कॉ राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सुर्यवंशी हि कामगीरी केली आहे.