जळगाव ( प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील भादली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्यातील संशयित याला पोलिसांनी रात्री अटक केली
भादली (जळगाव) येथील अल्पवयीन मुलीवर 34 वर्षीय नराधमाने .15 मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भादली तरसोद रोडच्या दरम्यान अत्याचार केल्याची घटना घडली. पीडितेने पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हा दाखल होताच संशयित तुळशीराम रवींद्र मस्के याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम अंतर्गत नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता 20 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.