मुंबई (वृत्तसंस्था) – आर.ए. किडवाई पोलीस वसाहतीत एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेने तो अधिकारी राहत असलेली इमारक सील केली आहे. विशेष म्हणजे याच वसाहतीच्या तळमजल्याला आर.ए.किडवाई मार्ग पोलीस ठाणे आहे.
आर.ए.किवडाई मार्ग पोलीस वसाहतीत राहणारा हा सहाय्यक पोलीस निरीक्षक एसबी वनमध्ये कार्यरत होता. त्याला दोन दिवसांपासून सर्दी व ताप येत होता. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी के.ई.एम हॉस्पिटल येथे जाऊन कोरोना चाचणी केली. दरम्यान ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या अधिकाऱ्याला पुढील उपचारासाठी अंधेरीच्या सेवन हिल रुग्णालयात नेले आहे. या अधिकाऱ्यासोबत खात्यातीलच दोन पोलीस उपनिरीक्षक वास्तव्याला होते. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी गुरूवारी केली जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यांनासुद्धा क्वारंटईन करण्यात आले आहे. राज्यभरात आतापर्यंत पोलीस खात्यातील 7 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. त्या सात जणांच्या संपर्कातील इतर 47 जणांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे.








