नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसने जगभरात हाहाकार घालत असून आतापर्यंत लाखो लोकांना याची लागण झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगात लॉकडाऊन करण्यात आले आहे. करोनाविरुद्धच्या लढाईसाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करत आहे. यामध्ये ९९ वर्षाच्या ब्रिटिश वृद्धाच्या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेणारे टॉम मूरे ९९ वर्षांचे आहेत. वार्धक्यामुळे त्यांचे शरीर थकले असले तरीही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. करोनाविरुद्धच्या लढाईसाठी त्यांनी एका बागेच्या १०० फेऱ्या मारत २.५ मिलियन पाउंड रक्कम जमविली आहे. ही रक्कम ते दान करणार आहेत.याविषयी बोलताना टॉम मूरे म्हणाले कि, मला आरोग्य संघटनेला (NHS) मदत करायची आहे. यासाठी मी हे काम करत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. या मदतीसाठी एनएचएसने आभार व्यक्त केले आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही टॉम मूरे यांचे कौतुक केले आहे.