बोदवड (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावातील बावीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सदर तरुण पुण्यात नोकरी निम्मित गेला होता. तो १८ रोजी घरी परतला असता त्याला सर्दी, खोकला जाणवत असल्याने त्याने घरातील सदस्यांना ही माहिती दिली असता १९ रोजी येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच तालुका आरोग्य अधिकारी निलेश चौधरी यांच्याशी संपर्क साधत या संशयीत रुग्णाला रुग्णवाहिकेने जळगाव येथे हलविले आहे. जळगावला त्याच्या एक्सरे (क्ष) किरण तपासणीत काहीच आढळून आले नाही. मात्र त्याचे रक्ताचे व लाळेचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहे. हा तपासणी अहवाल आल्यावरच चित्र स्पष्ट होईल.याबाबत बोदवड तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश चौधरी यांनी सांगितले की, सदर तरुणाला सर्दी, खोकला असल्याने त्याची जळगाव येथे तपासणी केली असून त्यास घराबाहेर न पडण्याचा सूचना देत सोडण्यात आले आहे.