नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाने जगभरात थैमान माजवला आहे. भारतातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे चक्रही पूर्णपणे थांबले आहे. तर दुसरीकडे भारत पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेचे थांबलेले चक्र सुरू करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. करोनाची लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे,असे मोदी यावेळी म्हणाले.

ANI
✔
@ANI
Prime Minister Modi today interacted with Bill&Melinda Gates Foundation Co-chair, Bill Gates via video conference. The dignitaries discussed global response to #COVID19 & importance of global coordination on scientific innovation & R&D to combat pandemic: Prime Minister’s Office
View image on TwitterView image on TwitterView image on Twitter
5,155
10:45 PM – May 14, 2020
Twitter Ads info and privacy
721 people are talking about this
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करोनाच्या लढाईतील समस्या आणि या आजाराशी लढण्याच्या उपाययोजना यावर चर्चा केली. तसंच यावेळी मोदी यांनी करोनाविरोधात भारतानं केलेल्या उपाययोजनांचीही बिल गेट्स यांना माहिती दिली. भारत आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीनं करोनाविरोधातील ही लढाई कठोरपणे लढत आहे. करोनाशी निगडित सर्व माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. याचा लाभ जगभरातील अन्य देशही घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असे मोदी म्हणाले.
तसेच स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेबाबत पहिल्यापासूनच जागरूक केले जात होते . करोना व्हायरसच्या लढाईत ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. करोनाविरोधातील लढाईत गेट्स फाऊंडेशन भारतासोबतच जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये मदत पोहोचवत आहे, हे खऱ्या अर्थाने उल्लेखनीय आहे, असेही मोदी म्हणाले.







