मुंबई (वृत्तसंस्था) – आपली करोनासोबतची लढाई सुरूच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत वाढवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनसंवाद साधला. महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ‘देशात करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र, देशात करोनाचं संकट आहे. लॉकडाउनमुळे उद्योग बंद आहेत. कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे करोनामुळे राज्यावर अर्थसंकट येणार आहे. ते आलेलं आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे करोनाचे परिणाम एक ते वर्ष जाणवतील,’ असा इशारा शरद पवार यांनी दिला.