नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतीय शेतकऱ्यांसाठी वरदान असणारा मान्सूनचा अंदाज आज हवामान खात्याने वर्तविला आहे. यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये सरासरीइतका पाऊस पडणार आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असेही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. यंदाचा मान्सून पूर्वानुमानामुळे दिलासादायक चित्र यंदा पाहण्यास मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.