• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनमुळे पिंपरीत ऑनलाईन लाइव्ह कवीसंमेलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोना संसर्गामुळे देशात सुरू असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कवी संमेलन घेणे शक्‍य नसल्याचे ओळखून फुलोरा परिवाराच्या वतीने रविवारी (दि. 12) यूट्युब लाईव्ह ऑनलाइन कवी संमेलन घेण्यात आले. त्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 83 कवी-कवियित्री सहभागी झाले होते. फुलोरा परिवार सदस्या सीमा गांधी यांच्या कल्पनेतून व फुलोरा समूह अध्यक्ष सुनील सातपुते यांच्या प्रयत्नातून हे ऑनलाइन यूट्युब लाईव्ह कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका जोत्स्ना चांदगुडे होत्या. चंद्रकांत वानखेडे, डॉ.अशोककुमार पगारिया, पुरुषोत्तम सदाफुले, प्रा. सुरेखा कटारिया, अनुज केसकर, प्रदीप कदम, सुहास घुमरे, दिनेश भोसले, फुलोरा कोअर कमिटीचे सदस्य रज्जाक शेख, रंजना बोरा यांच्यासह राज्यभरातील कवी-कवियित्रींनी या कवी संमेलनात ऑनलाइन सहभाग घेतला. बंडा जोशी यांची हास्य कविता रंगतदार ठरली. कविता रसिकांना घरबसल्या कवितांचा आनंद घेता आला. सुमारे चार तास हे कवी संमेलन चालले. दीड हजारांहून अधिक काव्यरसिकांनी हे संमेलन यूट्युब लाइव्हवर घरबसल्या पाहण्याचा आनंद लुटला. मराठी साहित्य विश्‍वातील हे अशा पद्धतीने झालेले ऑनलाइन कवी संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. करोना विषाणूच्या संसर्गाने निर्माण झालेल्या संकट काळात घरबसल्या लोकांना विरंगुळा, मनोरंजन देणे हे सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे. ऑनलाईन कवी संमेलन घेऊन फुलोरा परिवाराने काव्यरसिकांची मने जिंकली. अशी ऑनलाइन कवी संमेलने भरवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कवयित्री सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. सातपुते यांनी आभार मानले.


 

 

Previous Post

महावितरणच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मरला मोठी आग

Next Post

लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना होणार लाभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना होणार लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !
1xbet russia

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश
1xbet russia

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon