नवीदिल्ली (वृत्तसंस्था) –करोनाच्या महाराष्ट्रातील आणि भारताच्या निरनिराळ्या राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याविषयी लोकांमध्ये काहीशी भीती निर्माण होत आहे. सोशल मीडिया आणि खासकरून व्हॉटसअॅपवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ती वाचूनही लोकांमध्ये काही प्रमाणात भीती निर्माण होत आहे. कांद्यापासून गोमुत्रापर्यंत उपाय सुचवले जात आहेत, मात्र असे उपाय सुचवणारे लोक डॉक्टर नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे करोना व्हायरसपासून आपला बचाव करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका आणि अफवांना बळी पडू नका.
करोना व्हायरस नेमका काय आहे? हा व्हायरस कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती? त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती पुढील व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येईल.महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचा हा सर्वाधिक पाहिला जात असलेला, अतिशय महत्त्वाचा आणि करोनाबद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ आहे. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस नक्की कसा आला? कोरोनाबद्दल भीती का आहे? हा आजार बरा होतो का? हा आजार कसा पसरतो? या आजारापासून स्वत:ची काळजी कशी घ्यायची, याची माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगितली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास ५० हजार लोकांनी पाहिला आहे.