मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे महाराष्ट्रात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जगभरात या साथीची काय अवस्था आहे.
फ्रान्समध्ये चिंताजनक स्थिती-फ्रान्समध्ये या साथीची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे परिस्थिती प्रचंड वेगाने खालावत आहे, असे फ्रान्सच्या आरोग्य विभागप्रमुखांनी सांगितले आहे. दर तीन दिवसांनी बाधीतांची संख्या दुप्पट होत आहे. असे जेरोम सलोमन यांनी म्हटले आहे.
जर्मनीने निर्बंध लादले – जर्मनीने पाच देशातील सीमांवर निर्बंध लादले आहेत. कोरोना रोखण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
दक्षिण कोरीयात कोरोनाचे नवे 74 बाधीत- दक्षिण कोरीयात कोरोनाचे नवे 74 बाधीत आढळले आहे. आदल्या दिवशीपेक्षा ही संख्या आठने कमी आहे. त्यामुळे बाधीतांची संख्या आठ हजार 236 वर गेली आहे. तर कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या 75 वर पोहोचली आहे. 29 फेब्रुवारीला तेथे एका दिवसात 909 बाधीत झाले होते. हा आकडा आता कमी होत असल्याचे त्या देशाने म्हटले आहे.द. अफ्रिकेत परदेशी प्रवाशांना बंदी-द. अफ्रिकेत परदेशी प्रवाशांना प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांनी रविवारी जाहीर केले की, कोरोनाचा अधिक प्रभाव पडलेल्या सर्व देशातील प्रवाशांना बुधवारपासून प्रवेश बंद करण्यात येईल.
इटलीतील मृतांची संख्या वाढली-इटलीमध्ये कोरोनामुळे बुधवारी 368 जण मरण पावले. ही एका दिवसांत मरण पावलेल्यांची ही सर्वात जास्त संख्या आहे. मृतांची संख्या एक हजार 809वर पोहोचली आहे.चीनमध्ये मृतांची संख्या वाढली-चीनमध्ये मृतांची संख्या तीन हजार 213 झाली आहे. 14 जणांचा बुधवारी मृत्यू झाला. तर परदेशातून आलेल्यांना बाधा झाल्याची संख्या 123 झाली आहे. त्यामुळे चीनने बाहेरून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस विलगता कक्षात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चीनमधध्ये गेल्या 24 तासांत नवे 16 रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या 80 हजार 860 झाली.