नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – उरणमधील नौदल परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी शोध कार्याला सुरुवात केली असल्याची माहिती उरण वनक्षेत्र अधिकारी शशांक कदम यांनी दिली. येथील नौदलाच्या शस्त्रसाठा असलेल्या परिसरात सात-आठ दिवसांपूर्वी पीएमसी जेट्टीजवळ गस्ती दरम्यान सुरक्षा जवानांना बिबट्या दृष्टीत पडला. त्यामुळे नागरिकांना सावधगिरीच्या सुचना नौदल विभागाचे डेप्युटी जनरल एस.के.शर्मा यांनी दिलेल्या आहेत. याबाबत वन विभागाच्या अधिकार्यांना कळविण्यात आल्यानंतर वनविभागाने बिबट्याचा शोध घेतल्यास सुरुवात केली आहे. शोध घेताना वन अधिकार्यांना पायाचे ठसेही आढळून आले आहेत. हे ठशांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे.