नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात महिला हेरगिरांच्या नेटवर्कचा भांडाफोड करत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) लष्कर-ए-तैयबाच्या एका 22 वर्षीय हँडलरला 10 दिवसांसाठी ताब्यात घेतले आहे. जी पाकिस्तानमध्ये इतरांच्या संपर्कात होती, त्यात 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा समावेश आहे. माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेली तानिया परवीन अनेक सिमकार्डचा वापर करत पाकिस्तानमधील इतर हँडलरच्या संपर्कात होती. तिने भारतीय सिमदेखील वितरण देखील केले आणि ती व्हॉट्सअॅप ग्रुप व फेसबुकद्वारे संपर्क बनविण्याचे काम करीत होती.
प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख सईदच्याही ती संपर्कात होती. मिळालेल्या माहितीनुसार, इसिस तिचा वापर अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी करीत आहे. कोलकाता कार्यालयात दहशतवादविरोधी एजन्सीची एक टीम तिची चौकशी करेल. एनआयएने अलीकडेच या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी घेतली असून प्रतिबंधित पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी देशात काम करणाऱ्या महिला हेरांच्या नेटवर्कला ते लक्ष्य करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पेशल टास्क फोर्सने कोलकाताच्या मौलाना आझाद कॉलेजची विद्यार्थिनी तानिया परवीनला पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेजवळील बदुरिया येथून अटक केली. तानियावर वर्षभर पाळत ठेवल्यानंतर पकडण्यात आल्याचे समजते.