नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना युगात संपूर्ण जग एकाच वेळी दोन मोर्च्यावर युद्ध करीत आहे. पहिले लोकांच्या आरोग्याविषयी आणि दुसरे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी. लॉकडाऊन दरम्यान बंद उद्योग व्यवसायांमुळे जवळजवळ सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेचे गंभीर नुकसान झाले आहे. दरम्यान, अशा काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेचा फारच कमी परिणाम झाला आहे. आर्थिक सहकार आणि विकास संघटनेने (ओईसीडी) अलीकडेच कोरोना संकटाच्या विविध देशांच्या अर्थव्यवस्थांवर होणाऱ्या परिणामाचे परीक्षण केले आणि हे उघड केले की, भारताची अर्थव्यवस्था जगातील अशी दुसरी अर्थव्यवस्था आहे, ज्यावर कोरोनाचे सर्वात कमी परिणाम झाला.
ओईसीडीच्या अंदाजानुसार वैश्विक स्तरावर 2020 मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत जीडीपीत 6% घसरण होईल. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी फेरी समोर येणार नाही, यावर हा अंदाज आधारित आहे. त्याच वेळी, कोरोना संक्रमणाची दुसरी फेरी सुरू झाल्यास जागतिक जीडीपी 7.6 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ओईसीडीने पुढे सांगितले कि, कोविड -19 साथीचे रोग हे जागतिक आरोग्य संकट आहे. गेल्या एका शतकाच्या दरम्यान यामुळे सर्वात मोठी आर्थिक मंदी उद्भवली आहे, ज्यामुळे लोकांचे आरोग्य, त्यांची नोकरी आणि हितसबंधावर परिणाम झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांच्या जीडीपीवर प्रभाव पाहायला मिळाला. दरम्यान त्याचा सर्वाधिक परिणाम ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर होण्याचा अंदाज आहे. जेथे जीडीपी 11.5 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. यानंतर फ्रान्स, इटली सारखे देशही त्याच्या जवळ आहेत. दरम्यान, या संकटाचा सर्वात कमी परिणाम चीन आणि भारतावर होईल. कोरोना विषाणूचे सुरुवातीचे केंद्र असलेल्या चीनच्या जीडीपीत फक्त 2.6 टक्क्यांची घसरण असू शकते. त्यांनतर भारताचा जीडीपी 3.7 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. जरी चीनच्या तुलनेत हा एक मोठा फरक आहे, परंतु कोरोना संसर्गाची इतकी प्रकरणे आणि लॉकडाऊन दरम्यान पूर्णपणे ठप्प अर्थव्यवस्था असूनही, ही घसरण दाखवते की, भारतीय अर्थव्यवस्था किती मजबूत आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे जगात कोविडच्या केवळ 2,800 प्रकरणांची नोंद असताना या गोष्टी समोर आल्या. यातील जवळजवळ सर्वच वुहानमधील होत्या. त्यावेळी,तालेब अँड कंपनीने जे काही म्हंटले होते, त्यातील जवळपास सर्वकाही प्रत्येक देशाला करावं लागलं, दरम्यान, जीडीपी आणि कंपन्यांची आकडेवारी पाहणे निरुपयोगी आहे, कारण आज नाही तर उद्या आपत्ती समोर येईल आणि आपल्या ग्रोथमध्ये अनेक गुणांची कपात होईल. ही गोष्ट नैसर्गिक आहे. परंतु आपत्ती येईपर्यंत याकडे दुर्लक्ष केले जाते.