नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा आकडा दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. रविवारी सकाळी आलेल्या आकड्यांनुसार, मागच्या 24 तासात कोरोना व्हायरसची एकुण 11,929 नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि 311 मृत्यू झाले आहेत. ही आतापर्यंतची एका दिवसात समोर आलेली कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे आहेत. यापूर्वी एक दिवसात 11,458 नवीन प्रकरणे समोर आली होती.
आरोग्य मंत्रालयानुसार, कोरोना व्हायरसची आतापर्यंत एकुण 3,20,922 प्रकरणे झाली आहेत, ज्यापैकी 1,49,348 सक्रिय प्रकरणे आहेत आणि 1,62,379 बरे झाले आहेत. याशिवाय देशात आतापर्यंत संसर्गाने मरणार्यांची संख्या वाढून 9195 झाली आहे.
महाराष्ट्र 1,04,568 रूग्णांसह सर्व राज्यांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. येथे आतापर्यंत 51392 सक्रिय रूग्ण आहेत आणि 49346 रूग्ण बरे झाले आहेत. यशिवाय मृतांचा आकडा वाढून 3830 झाला आहे. दिल्लीत कोरोनाची 38958 प्रकरणे समोर आली आहेत, तर 1271 लोकांचा मृत्यू झाला आहे.
तमिळनाडुत कोविड-19 चा संसर्ग झालेल्यांची संख्या 42687 झाली आहे. राज्यात 18881 सक्रिय प्रकरणे आहेत आणि 23409 रूग्ण बरे झाले आहेत. तमिळनाडुमध्ये 397 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी वेगाने वाढणारी गुजरातमधील रूग्णांची संख्या थोडी कमी झाली आहे. आता बहुतांश रूग्ण बरे झाले आहेत. एकुण रूग्णांची संख्या राज्यात 23038 वर पोहचली आहे, तर 1448 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशात 13118 कोरोनाचे रूग्ण आहेत. बिहारमध्ये 6290, झारखंडमध्ये 1711, केरळात 2407 आणि राजस्थानात 12401 लोकांना कोविड-19 चा संसर्ग झाला आहे.
देशात कोरोना संसर्गाचा वेग वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून यामध्ये कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. बैठकीत प्रत्येक राज्याचा रिपोर्ट घेतला जाईल. आढावा घेतल्यानंतर पुढील रणनितीसाठी सूचना घेतल्या जातील. पंतप्रधान मोदी 16-17 जून रोजी देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होणार आहे.