जळगाव ( प्रतिनिधी )
शहरातील संजय गांधी नगर परिसरात नेहमीप्रमाणे काम करणाऱ्या दोन सफाई कामगारांना कंजारवाड्यातील कथित दादा ने शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली
आरोपी विकी गारुंगे याने मारहाण केलेले फिर्यादी धीरज सोनवणे यांनी त्यांच्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की सगळे काम सोडून माझ्या मावशीच्या घरासमोरच्या गटारी आधी साफ करा असे म्हणत विकी गारुंगे याने धीरज सोनवणे आणि आकाश सोनवणे या सफाई कामगारांना शिवीगाळ आणि मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली आरोपी विकी कडे चौकशी साठी आणि वाद सोडविण्यासाठी गेलेले महापालिकेचे आरोग्य अधीक्षक एस. बी. बडगुजर.
, आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे मुकादम राजेंद्र निळे यांनाही आरोपीने शिवीगाळ करून मी येथे दादा आहे या दोघांना येथेच मारून टाकीन अशी धमकी दिली त्यावेळी तेथे नगरसेवक चेतन सनकात हेही उभे होते
या आरोपी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी विकी यास पोलीस निरिक्षक निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या माहिती नुसार समता नगर येथून सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, अशोक संनगत, हेमंत कळस्कर चंद्रकांत पाटील यांनी ताब्यात घेतले आहे
सरकारी कामात अटकाव केल्याचा दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे
संलग्नके क्षेत्र