अहमदनगर(वृत्तसंस्था) – तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाले. राज ठाकरे यांच्या गेल्या महिन्यातील दौऱ्यात त्यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे फलकावर लिहून महापालिकेच्या निवडणुकीत मनसे भगवा झेंडा अधिक उंचावून धरेल असे संकेत दिले होते.
आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी ते बोलत होते. ‘महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ‘महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे,’ असं सांगितलं.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘मी काही वर्षांपूर्वी जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी तेव्हा शिवजयंती तारखेनुसा साजरी करायची की तिथीनुसार असं विचारलं होतं. यावर त्यांनी सांगितलं की, ३६५ दिवस करायची,’ असं शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार या वादावर बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं.दरम्यान तिथीनुसार साजरी करायची का याबद्दल सांगायचं झालं तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे,’ असं ठाकरे म्हणाले.