जळगाव (प्रतिनिधी ) शहरानजिक औरंगाबाद राज्यमार्गावरील कुसुंबा गावाजवळच्या लाखीचा पूल नावाने ओळखल्या जाणार्या नाल्याच्या पात्रात औषधीच्या बाटल्या व गोळ्यांचा मोठा साठा संशयास्पद पध्दतीने फेकून दिल्याचे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कुसुंबा येथून पो.नि.शिरसाठ यांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या औषधी व गोळ्या नेमक्या कोणत्या आहेत, त्या फेकून देणारे कोण व का फेकल्या ?, याबद्दल माहिती घेतली.
कुसुंबा येथिल गावाजवळील लाखीच्या पुलाजवळ औषधी बाटल्या व गोळ्यांचा मोठा साठा फेकल्यांची माहिती समजल्या नंतर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी सदर घटनास्थळी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, सचिन पाटील, योगेश बारी अस्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
सदर ठीकाणी नाल्या मध्ये औषधीची कुठलेही विल्हेवाट न लावता Zeytn Phrma प्रा. लि.कंपनीच्या औषधीच्या बाटल्या, Calcium syrup बोटल व रक्त वाढीचे औषधीच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या औषधी पाकिटांवर मुदतबाह्य ठरण्याची मुदत आहे. असल्याचा उल्लेख आहे. या गोळ्या टॉनिकच्या आहे.
याबाबत जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याला या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी काही नमुने ताब्यात घेतले आहे.सदर औषधी ही लाखोंच्या जवळपास आहे असा अंदाज लावला जात आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे इम्रान सय्यद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आनंदसिंग पाटील हे करीत आहे.