हिंगोणा, ता. यावल (प्रतिनिधी) – गावात काल दिनांक 12 रोजी एका 26 वर्षीय तरुणी पॉझिटिव आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती यावेळी वैद्यकीय पथक गटविकास अधिकारी प्रांताधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी देखील या भागाला भेट देऊन हा भाग सिल करण्यात आला होता पॉझिटिव रुग्णाच्या कुटुंबातील तीन लोकांना फैजपूर येथे विलगीकरण ठेवण्यात आले असून त्यांच्या वरती उपचार सुरू असल्याचे माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिली आज दिनांक 13 रोजी उपजिल्हाधिकारी श्री रविंद्र भारदे प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या कामाबाबत विचारपूस केली व थर्मामीटर आणि ऑक्सि मीटर योग्य पद्धतीने हाताळण्याची माहिती देखील दिली. त्यांनी स्वतः काही ग्रामस्थांची देखील तपासणी केली त्यावेळी सरपंच महेश राणे, कोतवाल सुमन आंबेकर, पोलीस पाटील दिनेश बाविस्कर, पोलीस विनोद पाटील उपस्थीत होते.