जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, त्याच प्रमाणे आपण सुद्धा सर्वांना एकत्र घेऊन “जळगाव कोरोणा मुक्त” ची लवकरात लवकर स्थापना करा, जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांची नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे स्वागतार्थ मागणी
जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी “चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे” नावाचे पुस्तक भेट देऊन नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे केले स्वागत
जळगाव (प्रतिनिधी) – आज दुपारी जळगाव शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार नवनियुक्त अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी स्वीकारला ,त्याप्रसंगी जळगाव जिल्ह्यामध्ये स्वागत म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एन एस यू आय *जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे* यांनी *चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे* या नावाचं पुस्तक भेट देऊन नवीन अधिष्ठांचे स्वागत केले.
तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना यासारख्या महा संकटाने थैमान घातले असून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन शत्रूंवर मात करत स्वराज्याची स्थापना केली,
त्यांचे विचार आत्मसात आणून नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनीसुद्धा कोरोणा या महासंकटावर मात करून *जळगाव जिल्हा कोरोणा मुक्त* करावा अशा प्रकारची मागणी जळगाव जिल्हा एन एस यू आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी चर्चा करते वेळी केली.