जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 52 नवीन रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या आता 1578 वर आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक 20 रूग्ण हे भुसावळचे आढळून आले असून याच्या खालोखाल 17 रूग्ण हे भुसावळचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण व जामनेर प्रत्येकी 3 ; पारोळा, एरंडोल व चोपडा प्रत्येकी 2 तर अमळनेर, रावेर आणि यावल प्रत्येकी 1 रूग्णांचा समावेश आहे. आजच्या 52 रूग्णांमुळे जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या तब्बल 1578 इतकी झाली आहे.