मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईमध्ये 113 रुग्ण आहेत तर रायगड, अमरावती, भिवंडी, पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एक, नवी मुंबईत 2, मीरा भाईंदर 7, ठाण्यात 2, वसई विरारमध्ये 2, पुण्यात 4 नवे रुग्ण सापडले आहेत.देशातील कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढताना दिसतोय. भारतात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 356 झाली आहे. तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना केसेसे समोर आल्या आहेत.