यवतमाळ (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील महिलांना आता जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी बॅंकेत यायचं काम नाही. त्यामुळे बँकेतील गर्दी कमी झालेली दिसून येत आहे. गावात मिनी बँकेच्या माध्यमातून लोकांना सोशल डिस्टिंगचा वापर करूनच पैसे देत आहे. यासाठी मिनी बँकेचे संचालक हरिष गडदे यांनी व्यवस्था केली. जनधन खात्यातील पैसे महिलांना घरपोच मिळत असल्याने राळेगाव तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी हा निर्णय चांगला घेतला अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.