मुंबई (वृत्तसंस्था) – सध्या देशासोबतच राज्यातही कोरोनाचे संकट घोंघावत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्ये बंद झाले आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशातच या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारकडून लोकांना फंड जमा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र यातही आता केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे. पीएम केअरला दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे केंद्र विरुद्ध सरकार असा वाद निर्माण होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावर संतापत व्यक्त केला आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवारांनी ट्विट केले आहे. ‘CM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं,” असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.