नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरस संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे आणि यामुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत आहे. कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा रोग असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्रीडा स्पर्धांवर होत आहे. अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही स्पर्धा प्रेक्षकांच्या अनुपस्थीत खेळवल्या जात आहेत. कोरोना व्हायरसचा परिणाम फुटबॉलवरही झाला असून काही खेळाडूंना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. अनेक मोठ्या फुटबॉल स्पर्धा एकतर स्थगित करण्यात आल्या आहेत किंवा बंद दरवाजा मागे खेळवण्यात येणार आहेत.पण असे असले तरी बंद दरवाजा मागे खेळण्यात येणाऱ्या स्पर्धा प्रेक्षकांना ऑनलाईन आणि टीव्हीवरती बघता येतील.
फुटबॉल स्पर्धांवर कोरोना व्हायरसमुळे झालेले परिणाम – यूएफा चॅम्पियन्स लीग – स्थगित, यूएफा युरोपा लीग – स्थगित, स्पॅनिश ला लीगा – स्थगित
इटालियन सेरी ए – स्थगित, जर्मन बुंडेसलिगा – बंद दरवाजा मागे, फ्रेंच लिग 1 – बंद दरवाजा मागे, इंग्लिश पी.एल. – बंद दरवाजा मागे , पोर्तुगीज प्राइमिरा लीगा – स्थगित , इंडियन सुपर लीग फायनल (चेन्नईयन एफसी विरुद्ध अॅथलेटिको दे कोलकाता) – बंद दरवाजा मागे, फिफा वर्ल्ड कप कतार 2022 साठी दक्षिण अमेरिकेतील संघांची पात्रता फेरी – स्थगित.