नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान केला आहे. देशातील कतृत्त्वान महिलांना त्यांनी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईरानीही त्यांच्यासोबत होत्या.