चाळीसगाव (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगाव आयोजित व्याखान मालेतील पुष्प दुसरे मेघना झुझम यांनी मी तुमची सावित्रीबाई फुले एक पात्री प्रयोगातून साक्षात सावित्री बाई फुले यांचे कार्य उभे करण्याचा आदर्श प्रयोग केला. या प्रयोगाचे प्रायोजकत्व डॉ. सुनीलदादा राजपूत यांनी वडिल कै. अमरसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ देणगी देऊन खऱ्या अर्थाने समाजाला बळकट करण्याचा प्रयत्न यातून केला आहे.
यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष तानसेन जगताप, डॉ. सुनील दादा राजपूत, अभिनेत्री मेघना झुझम , विजय पाटील, अण्णा धुमाळ, रामचंद्र गोसावी, बी, एल, ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अभिनेत्री झुझम यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून बालपणापासूनच्या सावित्रीबाई यांच्या खेळण्यापासून तर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर हावभाव सह सादर करून जिवंत पणा आणला. यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. इतका हूभेहुब प्रसंग चाळीसगावकरानी प्रथमच अनुभवला.
जोतिबा फुलेनि शाळा कश्या सुरू केल्या इथपासून तर सत्य शोधक समाजाची स्थापना पर्यंतचा प्रवास, यासह त्यांनी कुठला ग्रंथ का व कश्यासाठी लिहिला आदी सर्व घटना साक्षात चित्रपटासारख्या एकामागून एक त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांपुढे येत होत्या.जोतिबांच्या अखेरचा श्वास हा प्रसंग तर साक्षात प्रेक्षक ही ढसा ढसा रडत होते. असा जिवंत क्षण उभे करण्याचे कसब अभिनेत्री झुझम यांच्या वाणी तुन प्रत्येक्ष ऐकायला व बघण्याचे भाग्य चालीसगवतील श्रोत्यांना प्राप्त झाले. मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग नागरिकांनी चांगल्या कार्यासाठी करावा हे मात्र त्यांनी पदोपदी जाणीव करून दिली. यावेळी डॉ सुनील राजपूत यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तानसेन जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये संस्थेला जागा नसल्याची खंत व्यक्त केली. शाळीग्राम निकम यांनी परिचय करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पोतदार यांनी केले तर आभार गौतम निकम यांनी माणलेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुषमा पाटील, प्रतिभा बागुल, मनोहर आंधळे , राकेश बोरसे, पी, एस, चव्हाण, अशोक ब्राह्मणकर, जयसिंग बागुल, संगीता देव आदी मसाप सद्सयनी सहकार्य केले. चाळीसगावतील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.