नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात लॉकडाऊन सुरू असताना नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, भारतीय रेल्वेने आपल्या पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 मे पासून पॅसेंजर ट्रेन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी तिकिट बुकिंगची सुरूवात 11 मे रोजी संध्याकाळी 4 वाजेपासून करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे नागरिकांना IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीटांची बुकिंग करता येईल. वाजल्यापासून सुरू होणार आहे. तिकिट बुकंगसाठी नागरिकांनी लॉगइन करावे.

सुरुवातीला रेल्वेकडून (जाणे येणे पकडून) 30 ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. या रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणं तसेच सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं बंधनकारक असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यासोबतच रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना रेल्वेत बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जर प्रवाशांमध्ये संक्रमणाचे कोणतेही लक्षण जाणवले तर मात्र असा प्रवाशांना प्रवास करता येणार नाही.
ANI
✔
@ANI
· 17h
Indian Railways plans to gradually restart passenger train operations from 12th May, initially with 15 pairs of trains (30 return journeys): Ministry of Railways
View image on Twitter
ANI
✔
@ANI
These trains will be run as special trains from New Delhi Station connecting Dibrugarh, Agartala, Howrah, Patna, Bilaspur, Ranchi, Bhubaneswar, Secunderabad, Bengaluru, Chennai, Thiruvananthapuram, Madgaon, Mumbai Central, Ahmedabad and Jammu Tawi: Ministry of Railways
737
8:38 PM – May 10, 2020
Twitter Ads info and privacy
191 people are talking about this
रेल्वे सुरुवातीला 15 ट्रेन दिल्लीतून सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. या ट्रेन दिल्लीतून पाटणा, मुंबई, अहमदाबाद, रांची, बिलासपूर, भुवनेश्वर, तिरुवनंतपुरम, सिकंदराबाद, बंगळुरू, मडगांव या स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. आणखी एक महत्वाची सूचना रेल्वे स्थानकांमधील तिकिच बुकिंग खिडकी बंद राहणार आहे. प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकिट बुकिंग करावे. तसेच प्लॅटफॉर्म तिकिटासाठीही काऊंटर सुरु करण्यात येणार नाहीये.







