जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 130 नवीन रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या आता 1526 वर आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
आज पुन्हा सलग तिसर्या दिवशी 100 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनोच्या रिपोर्टबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण १३० नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक २२ रूग्ण धरणगाव शहरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच्या सोबत रावेर-२१; जळगाव-२०; जामनेर-१८; चोपडा, जळगाव ग्रामीण व भुसावळ प्रत्येकी पाच; भडगाव व यावल प्रत्येकी २; पाचोरा-३; पारोळा-९; बोदवड-४; एरंडोल १ असे रूग्ण आढळून आले आहेत.