जळगाव (प्रतिनिधी) – सिव्हील हॉस्पीटलमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्यासह पाच जणांना निलंबीत करण्यात आले असून याचे आदेश आज देण्यात आले आहेत.

सिव्हील हॉस्पीटलमधील शौचालयात कोरोना बाधीत वृध्द महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली असून या प्रकरणी जनभावना तीव्र झालेली आहे. या संदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत कालच मिळाले होते. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे; सहाय्यक प्राध्यापक, डॉ. सुयोग चौधरी, डॉ. कल्पना घनकवार यांच्यासह पाच जणांना निलंबीत निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत.







