पुणे (वृत्तसंस्था) – मंचर येथील महिला वकिल रूपाली वसंत थोरात (वय ३२) हिने फॅनला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना रविवार (दि.१०) सकाळी घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापुर्वी तिने लिहीली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती सांगताना जी.ए.डावखर म्हणाले, मंचर शहरातील चाळीसबंगला सोसायटी जवळील विठ्ठल ओंकार सदनिका क्रमांक ४०३ मध्ये रूपाली वसंत थोरात आणि तानाजी रामचंद्र जाधव हे एकत्रपणे राहत आहे.
घरातील फॅनला रूपालीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यावेळी तानाजी जाधव घरी नव्हते. घरी आल्यानंतर रूपालीने आत्महत्या केल्याचे त्यांना दिसुन आले. आत्महत्या करण्याच्या अगोदर रूपाली हिने माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. असे चिठ्ठीमध्ये तिने लिहिले होते.
या घटनेची माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना समजताच त्यांनी पोलिस जवान जी.ए.डावखर आणि पी.एम.मोरे यांना सोबत घेवुन घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.