मुंबई (वृत्तसंस्था) – परळी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवरून आज रूट मार्च काढण्यात आला. सबंध देशभरामध्ये कडक संचारबंदी असतानादेखील अनेकजण याचं उल्लंघन करताना आढळून येत आहेत. बीडमध्ये संचारबंदीच्या शिथिलते दरम्यान अनेक उनाड नागरिक विनाकारण रस्त्यावर बाहेर पडतायत. यालाच चाप बसावा यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.वारंवार विनंत्या करून देखील नागरिकांकडून याच सर्रासपणे उल्लंघन करण्यात येतेय. त्यामुळेच जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्यावतीने पथसंचलन करून मुख्य रस्त्यावर रूट मार्च काढण्यात आला. जिल्ह्यातील परळीत सर्वाधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आलं. अन्यथा उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील आता पोलिसांकडून देण्यात आलाय.