मुंबई (वृत्तसंस्था) – स्थानिक जिल्हा शासकीय रुग्णालयात 6 एप्रिल रोजी एक पॅरालिसिसचा रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. नियमित रुग्ण असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते, दरम्यान अलीकडच्या काळात त्यास ताप, खोकला वाढत असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी त्याचे नमुने कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यानंतर त्याचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आढळून आला. त्यामुळे डॉक्टर, नर्स आणि MICU वार्डातील इतर रुग्ण धास्तावले आहेत. सध्या त्या रुग्णावर उपचार करणारे आणि त्याच्या संपर्कात आलेले डॉक्टर नर्स असे 44 जण कॉरंटाइन करण्यात आले आहेत.